सुस्वागतम

जि.प.प्राथ.शाळा अनोरे,केंद्र-पष्टाणे,ता-धरणगाव,जि-जळगाव ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत आहे.

Thursday, 29 November 2018

मतदार यादीत नाव शोधणे


नमस्कार मित्रांनो ..लोकसभा विधानसभेच्या निवडणूकांचे  वारे वाहू लागले आहेत .आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा ..नंतर आपल्या विधानसभा मतदार संघाचे नाव / मतदान कार्ड नंबर टाका आपले नाव टाकल्यावर आपले व आपल्या कुटुंबाची नावे यादी भाग क्रमांक यादीतील अनुक्रमांक दिसतील ..


Sunday, 22 July 2018

  श्री विठ्ठल माहात्म्य

                                  || श्री पांडुरंग ||
पंढरीच्या सावळ्या परब्रह्मांची विविध काळात विविध नावांनी उपासना केली आहे. पंढरीनाथपांडुरंगपंढरीरायाविठाईविठोबाविठुमाऊलीविठ्ठल गुरूरावपांडुरंगहरिइ. नांवे भक्तांनी दिलेली आढळतात.आज सर्वपरिचित व प्रचलित नांव म्हणजे 'पांडुरंग'आणि 'श्रीविठ्ठल'. विठ्ठल शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचा अनेक इतिहासकारांनी व संशोधकांनी अभ्यास केला आहे.बरेच लोक विठ्ठल हा शब्द विष्णु या शब्दाचा अपभ्रंश आहे असे म्हणतात. कानडी शिलालेखातही जे विठ्ठरसविट्ट असे शब्द आले आहेत ते विष्णु शब्दाची व्याप्ती सांगणारेच आहेत असे मानले जाते.संत तुकोबारायांनी विठोबा शब्दाची उत्पत्ती आपल्या एका अभंगात अत्यंत सोप्या भाषेत केली आहे. तो असा की वि म्हणजे ज्ञान ठोबा म्हणजे आकार -ज्ञानाचा आकार किंवा ज्ञांनाची मूर्ती म्हणजे विठोबा किंवा वि म्हणजे गरूड अणि ठोबा म्हणजे आसन अर्थात गरूड ज्याचे आसन आहे तो विष्णू तोच कटीवर कर ठेवूनि विटेवरी उभा आहे. श्रीकृष्णश्रीविष्णु आणि श्रीविठोबा हे एकच आहेत. श्रीकृष्णाचा अवतार द्वापार युगाच्या शेवटी बुधवारी श्रावण वद्य अष्टमीला झाला. विठोबा म्हणजे श्रीकृष्ण म्हणून बुधवार हा विठ्ठलाचा वार मानला जातो. आजही वारकरी लोक बुधवारी पंढरपुरातून जात नाहीत.

Saturday, 21 April 2018

निरोप समारंभ 2017 -18

काल माझ्या इ चौथी च्या वर्गाचा निरोप समारंभ संपन्न झाला..गेली चार वर्षांपासून नियमित हसत मुखाने माझ्या मोटार सायकल जवळ येऊन शाळेत येतांना  Good morning तर  संध्याकाळी जातांना Good evening म्हणतांना त्यांचा चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद  आणि दिवसभर प्रसन्न राहणारी चिमुकले आता माझी शाळा सोडून जातील ह्या विचाराने मन भरून येते.. पुढच्या शिक्षणासाठी माध्यमिक शाळेत जातील...
             या प्रसंगी एवढेच म्हणावेसे  वाटते की " अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती !! "  या निरोप समारंभात भाषण देतांना माझे विद्यार्थी, सहकारी शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री प्रभाकर पाटील सर... Miss you All My  students...सुज्ञ  नागरीक  व्हा, गावाचे आणि आपल्या zp शाळेचे नाव मोठे करा. ह्याच शुभेच्छासह निरोप देण्यात आला.
                    --वर्गशिक्षक : श्री. दिनेश पाटील.