व्हिडीओ पाहण्यासाठी वरील लिंक ला टच करा..
Dinudada
- Home
- आमच्याविषयी
- शैक्षणिक साहित्य
- विषय
- शिक्षकमित्र
- ज्ञानामृत
- ऑनलाईन सेवा
- DIGITAL WORLD
- VIDEO
- MOBILE APPS
- स्कॉलरशिप परीक्षा
सुस्वागतम
Monday, 18 July 2022
Friday, 15 April 2022
शाळापूर्व तयारी अभियान
*🎯शाळापूर्व तयारी अभियान🎯*
_शाळापूर्व तयारी मेळावा घ्यायच्या दिवशी सर्व प्रथम *प्रभातफेरी* काढायची आहे. आपल्याला शाळेत *७ प्रकारचे स्टॉल* लावायचे आहेत. सर्व स्टॉल हे विद्यार्थ्यांच्या *सर्वांगीण विकासाशी* संबंधित आहेत._
*1️⃣ स्टॉल क्र-१ नाव नोंदणी आणि रिपोर्ट कार्ड देणे.*
_पहिलीत येणाऱ्या मुलांचे स्वागत करायचे आहे.त्यांचे वजन,उंची याची नोंद करायची आहे._
*2️⃣स्टॉल क्र-२ शारीरिक विकास*
_यामध्ये दोरीच्या उड्या, दोन्ही हाताच्या साहाय्याने चेंडू किंवा रिंग फेकणे,कागदाच्या साहाय्याने होडी तयार करणे,रंग भरणे,चेंडू बादलीत टाकणे अशा वेगवेगळ्या कृतींचे आयोजन करून मुलांचा शारीरिक विकास कितपत झालेला आहे हे तपासायचे आहे.यात मुलांना मदतीची गरज आहे का किंवा तो चांगले करतो/करते याप्रमाणे नोंद करायची आहे._
*3️⃣स्टॉल क्र-३ बौद्धिक विकास*
_यामध्ये लहान-मोठा फरक ओळखणे,२ प्रकारांमध्ये वर्गीकरण(जसे-फळे व पक्षी),दिलेल्या वस्तू-चित्रे क्रमाने लावणे,जोडी लावणे या क्षमतांचा समावेश होतो._
*4️⃣स्टॉल क्र-४ सामाजिक आणि भावनात्मक विकास*
_यामध्ये घरी राहिल्याने मुलांमध्ये सामाजिक आणि भावनात्मक विकास कशा पद्धतीने झाला हे आपल्याला तपासायचे आहे.यात आपण त्यांना आपल्या परिवारातील सदस्यांची नावे सांगणे,खेळ/क्रियांमध्ये आनंदाने सहभागी होणे,स्वच्छ आणि नीटनेटके राहणे,धीटपणे बोलणे या क्षमतांची आपण नोंद घेणार आहोत._
*5️⃣स्टॉल क्र-५ भाषा विकास*
_यात चित्र पाहून वर्णन करणे, गोष्ट सांगणे,अक्षरे ओळखणे,अक्षरे पाहून ओळखणे या क्षमतांची नोंद आपल्याला घ्यायची आहे._
*6️⃣स्टॉल क्र-६ गणनपूर्व तयारी*
_यात कमी-जास्त ओळखणे,आकार ओळखणे,अंक ओळखणे,वस्तू मोजणे या क्षमतांची नोंद आपल्याला घ्यायची आहे._
*7️⃣स्टॉल क्र-७ मातांना साहित्य देणे व मार्गदर्शन.*
_यामध्ये सर्व नोंदी तपासून त्यानंतर सर्व मुलांना व पालकांना मार्गदर्शन करायचे आहे._
_तर अशा पद्धतीने आपल्याला स्टॉल उभारायचे आहेत._
═══════════════════