सुस्वागतम

जि.प.प्राथ.शाळा अनोरे,केंद्र-पष्टाणे,ता-धरणगाव,जि-जळगाव ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत आहे.

Thursday 2 November 2017

शिष्यवृत्ती परीक्षा ५ वी आणि ८ वी

स्कॉलरशिप परीक्षा -- सराव प्रश्नपत्रिका , परीक्षा स्वरूप  बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा  








Tuesday 31 October 2017

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा अभ्यासक्रम व आराखडा तसेच परीक्षेबद्दल संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा



Sunday 15 October 2017

शैक्षणिक दिवाळी अंक

नाशिक जिल्ह्यातील उपक्रमशिल शिक्षक व महाराष्ट्र शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार 2017 प्राप्त झालेले आमचे मित्र श्री निलेश भामरे सर यांचा वाचनीय लेख माझा सिंगापूर दौरा.
वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा

संपूर्ण दिवाळी अंक पाहण्यासाठी खाली क्लिक करा 

Saturday 26 August 2017

एक्सेल शिट्स

नमस्कार मित्रानो,
महाराष्ट्रातील अनेक तज्ञ शिक्षक मित्रांनी अतिशय मेहनतीने तयार केलेल्या वेगवेगळ्या एक्सल फाईल व लिंक देत आहे. 
शालेय कामात यांचा निशितच उपयोग होईल.

अ.क्र.फाईलचे नावनिर्मात्याचे नावडाउनलोड लिंक
1मासिक पगार दाखलाश्री.परशुराम शिंदेDOWNLOAD
2तिमाही पगार दाखलाश्री..परशुराम शिंदेDOWNLOAD
3निकालपत्रक ( फोटोसह )श्री.सोमनाथ गायकवाडDOWNLOAD
4जनरल रजिस्टरश्री.सोमनाथ गायकवाडDOWNLOAD
5आजचे वय काढाश्री.सोमनाथ गायकवाडDOWNLOAD
6शा.पो.आहार.(१ ते ८)श्री.सोमनाथ गायकवाडDOWNLOAD
7शा.पो.आहार( मासिक)श्री..परशुराम शिंदेDOWNLOAD
8वार्षिक पगारश्री..परशुराम शिंदेDOWNLOAD
9गावपंजिकाश्री.महेश हारकेDOWNLOAD
10माझी समृद्ध शाळाश्री.महेश हारकेDOWNLOAD
11शा.पो.आहारश्री.महेश हारकेDOWNLOAD
12गुणवत्ता सनियंत्रण प्रपत्र QMTश्री.महेश हारकेDOWNLOAD
13गावपंजिकाश्री.नंदकुमार तेलंगेDOWNLOAD
14जनरल रजिस्टरश्री.विकास नागोसेDOWNLOAD
15INCOME TAX 2015-16श्री.विकास नागोसेDOWNLOAD
16कुटुंब सर्वेक्षणश्री.विकास नागोसेDOWNLOAD
17शा.पो.आहार.१ ते ५श्री.विकास नागोसेDOWNLOAD
18शा.पो.आहार.६ ते ८श्री.विकास नागोसेDOWNLOAD
19पगार डायरीश्री.विकास नागोसेDOWNLOAD
20निकालपत्रक (CCE)श्री.विकास नागोसेDOWNLOAD
21उपस्थिती भत्ताश्री.विकास नागोसेDOWNLOAD
22पगारपत्रक ( UP TO 5 YEARS )श्री.आदित्य रामा दासDOWNLOAD
23जनरल रजिस्टरश्री.नाईक लक्ष्मीकांतDOWNLOAD
24पायाभूत चाचणी गुण संकलनश्री.अनिस शाहDOWNLOAD
25इन्क्रिमेंट फॉर्म्युलाश्री.अनिस शाहDOWNLOAD
26गणिती क्रियाश्री.अनिस शाहDOWNLOAD
27सोसायटी लोन फॉरमॅट-DOWNLOAD
28वेळापत्रक-DOWNLOAD
29PITCURE MATCH WORDश्री.सुनील जाधवDOWNLOAD
30CROSS PUZZALश्री.सुनील जाधवDOWNLOAD
31मध्यान योजना (शा पो आहार)श्री. ऋषिकेश चौधरीDOWNLOAD
32जन्म तारीख अंकी व अक्षरात लिहणेश्री.ऋषिकेश चौधरीDOWNLOAD
33जिल्हे व तालुके श्री.ऋषिकेश चौधरीDOWNLOAD
34नाव वेगळे करणे व जोडणेश्री.ऋषिकेश चौधरीDOWNLOAD
35पगार स्लीपश्री.ऋषिकेश चौधरीDOWNLOAD
36पगारातील फरक काढणेश्री.ऋषिकेश चौधरीDOWNLOAD
37मासिक पत्रकश्री.ऋषिकेश चौधरीDOWNLOAD
38वार्षिक वेतनवाढ काढणेश्री.ऋषिकेश चौधरीDOWNLOAD
39सेवानिवृत्ती दिनांक काढणेश्री.ऋषिकेश चौधरीDOWNLOAD
40निकालपत्रकश्री.ऋषिकेश चौधरीDOWNLOAD
41धान्य व तेल मोजमाप ( शा पो आहार)श्री.ऋषिकेश चौधरीDOWNLOAD
42 निकाल पत्रक नवीन फोटोसह श्री सोमनाथ गायकवाड DOWNLOAD
43



























५० उपयुक्त मोबाईल apps माहिती साठी येथे click करा 

Monday 7 August 2017

ज्ञानरचनावाद



ज्ञानरचनावाद.... काय आहे आणि काय नाही ?
नीलेश निमकर
गेल्या काही वर्षांत शिक्षणाच्या क्षेत्रात, विशेष करून प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात ज्ञानरचनावादाचा बराच बोलबाला आहे. रचनावाद, रचनावादी शिक्षणपद्धती असे शब्द वारंवार कानी पडतात. अनेकदा असे अनुभवास येते की या शब्दांचा अर्थ प्रत्येक जण आपल्याआपल्या सोयीने लावत असतो. शाळेत साधने वगैरे वापरून कृतियुक्त शिक्षण देणारे रचनावादाचे पुरस्कर्तेआमच्या शाळेत आम्ही रचनावादी पद्धत वापरतोअसे अभिमानाने म्हणताना दिसतात तर रचनावाद येण्याआधी पासून आम्ही तुम्ही सांगता त्या गोष्टी करतच होतो, तुम्ही त्याला फक्त नाव दिलेतअसे काहीजण म्हणताना दिसतात. काहीजणवर्तनवादविरुद्ध रचनावादअशी मांडणी करताना दिसतात. या मतमतांतरांमुळे बर्‍याच जणांचा गोंधळ होणे साहजिक आहे. त्यातून या विषयावर मराठीतून फारसे वाचायलाही मिळत नाही. म्हणून या लेखात रचनावादाची नेमकी संकल्पना काय आहे याची तोंडओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. इथे एक बाब लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे, ही केवळ तोंडओळख आहे. या विषयाची व्याप्ती बरीच मोठी असल्याने अधिकचे वाचन करून, सहकार्‍यांंशी चर्चा करून रचनावादाची पुरेशी सखोल समज बनवणे शिक्षक़ांसाठी अत्यावश्यक आहे.
रचनावाद हा मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकणारा एक सिद्धांत आहे. माणसाचे मूल कसे शिकते, या जुन्याच प्रश्नाचे नवे, अधिक विस्तृत उत्तर देण्याचा प्रयत्न रचनावादाने केला आहे. मात्र अजूनही या प्रश्नाचे परिपूर्ण उत्तर आपल्या हाती आले आहे असे नाही. मात्र नवनव्या संशोधनांतून या विषयीच्या आपल्या ज्ञानात नित्यनेमाने भर पडत आहे हे नक्की. मुलांच्या शिकण्याबाबत रचनावादाचे काय म्हणणे आहे हे पाहण्याआधी, आपण शिकण्याबाबतचे रचनावादाच्या आधीचे सिद्धांत काय होते हे पाहणे गरजेचे आहे.
कोरी पाटी सिद्धांत

Wednesday 2 August 2017

श्री विठ्ठल माहात्म्य

  श्री विठ्ठल माहात्म्य

                                  || श्री पांडुरंग ||
पंढरीच्या सावळ्या परब्रह्मांची विविध काळात विविध नावांनी उपासना केली आहे. पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठुमाऊली, विठ्ठल गुरूराव, पांडुरंग, हरि, इ. नांवे भक्तांनी दिलेली आढळतात.आज सर्वपरिचित व प्रचलित नांव म्हणजे 'पांडुरंग'आणि 'श्रीविठ्ठल'. विठ्ठल शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचा अनेक इतिहासकारांनी व संशोधकांनी अभ्यास केला आहे.बरेच लोक विठ्ठल हा शब्द विष्णु या शब्दाचा अपभ्रंश आहे असे म्हणतात. कानडी शिलालेखातही जे विठ्ठरस, विट्ट असे शब्द आले आहेत ते विष्णु शब्दाची व्याप्ती सांगणारेच आहेत असे मानले जाते.संत तुकोबारायांनी विठोबा शब्दाची उत्पत्ती आपल्या एका अभंगात अत्यंत सोप्या भाषेत केली आहे. तो असा की वि म्हणजे ज्ञान ठोबा म्हणजे आकार -ज्ञानाचा आकार किंवा ज्ञांनाची मूर्ती म्हणजे विठोबा किंवा वि म्हणजे गरूड अणि ठोबा म्हणजे आसन अर्थात गरूड ज्याचे आसन आहे तो विष्णू तोच कटीवर कर ठेवूनि विटेवरी उभा आहे. श्रीकृष्ण, श्रीविष्णु आणि श्रीविठोबा हे एकच आहेत. श्रीकृष्णाचा अवतार द्वापार युगाच्या शेवटी बुधवारी श्रावण वद्य अष्टमीला झाला. विठोबा म्हणजे श्रीकृष्ण म्हणून बुधवार हा विठ्ठलाचा वार मानला जातो. आजही वारकरी लोक बुधवारी पंढरपुरातून जात नाहीत.

ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला

ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ॥धृ॥
भूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता

मज वदलासी अन्य देशि चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू
तैं जननीहृद् विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ती उद्धरणी मी येईन त्वरे कथुनि सोडिले तिजला ॥
सागरा प्राण तळमळला

प्रेरणादायी भाषण-स्टीव्ह जॉब्स

स्टीव्ह जॉब्सने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात केलेले भाषण प्रचंड गाजले. हे भाषण म्हणजे त्यांच्या प्रेरणादायी आयुष्याचा गोषवारा आहेश्री. अमोल कडू याने त्याचा केलेला मराठी अनुवाद.
जगातल्या सर्वोत्तम गणल्या जाणा-या महाविद्यालयांपैकी एक अशा महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात तुमच्यासोबत बोलायची संधी मला मिळते आहे, हा मी माझा बहुमान समजतो.