सुस्वागतम

जि.प.प्राथ.शाळा अनोरे,केंद्र-पष्टाणे,ता-धरणगाव,जि-जळगाव ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत आहे.

शैक्षणिक लेख-माझा सिंगापूर दौरा लेखक श्री निलेश भामरे

*माझा सिंगापूर दौरा*

*निलेश भामरे*

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटविहीर*
*ता. कळवण जि. नाशिक*
   

भारत स्वतंत्र झाल्यापासून या देशातील प्राथमिक शिक्षक प्रगत देशातील शिक्षणपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी विदेशात जाण्याची ही पहिलीच घटना. महाराष्ट्र राज्याचे प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व मा. नंदकुमार साहेब यांच्या प्रेरणेने मी दिनांक 30 जानेवारी ते4 फेब्रुवारी 2017 या कालावधीत सिंगापूर या प्रगत देशाचा आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा केला. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत राज्यात शिक्षण समृद्धी तसेच शिक्षक प्रगल्भ करीता नवोपक्रम राबविले जात आहेत. त्याची परिणती विद्यार्थी गुणवंत होताना दिसत आहे त्याच्या पुढील आश्वासक पुढचे पाऊल म्हणजे हा आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा.

PISA (Programme for International Students Assessment)च्या आधारे जागतिक पातळीवर गुणवत्ता मानांकनात अव्वल स्थान असणाऱ्या सिंगापूर देशाचा दौरा उत्कंठावर्धक होता. डू और डोण्ट च्या सुचना मिळाल्या होत्या. त्या नुसार विमान प्रवासात फ्लाईट बॅगेज तीस किलो व हॅण्ड बॅग  सात किलो वजनाच्याच असायला हव्यात हे पहिल्यांदाच कळले. विमानतळावर एक सिंगापूर डॉलर साठी पन्नास रूपये खर्च करून आवश्यक चलन बदलून घेतले.जिवनातील पहिला विमानप्रवास भिती व आनंदाच्या मिलाफात मुंबई ते सिंगापूर झाला.
     सिंगापूर देश म्हणजे कमी लोकसंख्येचे छोटे से बेट. कुठलीही साधनसंपत्ती (माती,पाणी,जमीन) नसताना अल्पावधीतच केलेली प्रगती थक्क करणारी वाटली. सर्व प्रथम आमच्या गाईडने सिंगापूर फ्लायर या जगातील सर्वात उंच पाळण्यात बसवून सिंगापूर दर्शन घडविले. दुसर्‍या दिवशी एज्युकेअर ह्या आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षकांना प्रशिक्षित करणार्‍या  संस्थेतील डॉ. हरपाल सिंग यांनी 21व्या शतकातील शिक्षकाची भुमिका THE LEADER या विषयातून मांडली. त्यात
1) शिक्षकाने स्वतः ऐकण्याचे कौशल्य विकसित करणे 2) स्वतः मधील सुप्त गुण ओळखून विकसित करणे3) संदर्भासह विषयाचे सर्वंकष ज्ञान शिक्षकाकडे असणे. 4) आपल्या चांगल्या कल्पना,आचार विचार इतरांशी शेअर करणे.5) जगात जे काही चांगले आहे त्यातले आपल्याला काय स्वीकारता येईल याचा विचार करणे.6) प्रत्येक शिक्षकात एका लिडरचे सर्व गुण असायला हवे.

L-Lead .......students

E-Engage ...In meaningful ventures

A- Adress...Concerns & Desires

D-Drive...Towards a common&shared vision in a class

E-Energies ...sprit

R- Realise. ...Goals &Aspirations.

S- Scream. ...Share ,share and share
डॉ. हरपाल सिंग यांच्या व्याख्यानातून सकारात्मक दृष्टिकोनाचे दर्शन घडले.
तिसर्‍या दिवशी *"ईथे देशाचे भविष्य घडते आहे"*असे ब्रीदवाक्य असलेल्या झिनमिन प्रायमरी स्कूल या सरकारी शाळेला भेट दिली. शाळेतील भव्य स्वच्छ सुंदर इमारत पाहून मन प्रसन्न झाले. शाळेतील प्रवेश दाराजवळ शाळेच्या विविध ठिकाणी शालेय उपक्रमाची डिजिटल फलक लक्ष वेधत होती. शाळेच्या प्राचार्यांनी त्या बाबतीत माहिती दिली. शाळेतील भव्य क्रीडांगण, सुसज्ज ग्रंथालय, हवेशीर  व ईंटरनेट जोडणी असलेल्या वर्ग खोल्या,टेरेसवरील वनस्पती बाग,किचन हाॅल,सुंदर स्वप्नवत वाटणारी स्वच्छतागृहे,आकर्षक कलादालन, सर्वञ सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमॅट्रीक मशीन, एसी स्टाफ रूम, काॅनफरन्स हाॅल हे सर्व काही मनाला भुरळ घालत होते.तितक्यात गुबगुबीत गोर्‍या गालाचे विद्यार्थी मैदानावरून खेळून आल्यावर बी व्हीटॅमिनचे ज्यूस घेताना दिसले.ज्ञानदानाबरोबरच  सकसआहार व सुदृढ आरोग्यावर भर दिसला.तेथील शिक्षकांशी चर्चा केल्यावर सिंगापूर मधील शिक्षण पद्धतीत1) प्रात्यक्षिक ज्ञानावर अधिक भर2) मुख्य विषय गणित, विज्ञान ,इंग्रजी 3)आधुनिक तंत्रज्ञानाचा व अध्यापन पध्दतीचा वापर 4) ग्रुमिंग क्लासेस द्वारा अभ्यासात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. 5) विद्यार्थी सतत गैरहजर असेल तर पालकाला तुरुंगवास किंवा पाचहजार डॉलरची शिक्षा. 6) परिक्षा पेपर तज्ज्ञ गटाकडून निर्मिती व पेपरतपासणी दुसर्‍या देशातील विद्यापीठाकडे होते. 7) जगात होणारे बदल अभ्यासक्रमात स्विकारले जातात.8) लोकवर्गणी हा प्रकार नसून सर्व सुविधा शासन पुरविते.9) शाळेची वेळ सकाळीस7ते1.10)इयत्ता 1ते6 प्रायमरी तदनंतर PSLE चाचणी अनिवार्य
त्या चाचणीतील श्रेणी वर आधारीत पुढील शिक्षण चार क्षेञात.
अशा विविध प्रश्नांची उत्तरे मिळाली.
  दिवसभर शैक्षणिक चर्चेनंतर सायंकाळी सिंगापूर दर्शन अर्थातच
*नीवाॅटर सेंटर*  पाणी वाचविण्यासाठीचा अभूतपूर्व फंडा.
*सॅनटोसा आयलंड*जंगल व समुद्र पार करून केबलकारचा डोळ्याचे पारणे फेडणारा प्रवास.
      *सायन्स सेंटर*जगातील सर्व शोधांचे आगार 3डी तंत्रज्ञानाचा अविष्कार
*मादाम तुसा संग्रहालय*जगातील नामांकित व्यक्तींचे हुबेहुब मेणाचे पुतळे बघताक्षणी छायाचित्रण करण्याचा मोह आवरता येत नाही.
*सी अॅक्वरिअम*250हेक्टर जमीन व पाण्याखाली अतिशय भव्य मत्स्य संग्रहालय. एक लाखाहून अधिक जलचरांचा विहाराचे विहंगम दृश्य.
तसेच येथील साईट सिईंग मधील *मरिना बे ,मानवनिर्मित गार्डन्स बाय द बे,नाईट सफारी, मेट्रो राईड,विंग्ज ऑफ टाईम शो*येथील भोजन, संस्कृती, कला-परंपरा लक्षणीय व अविस्मरणीय आहे.चोवीस तास चालू असलेले मुश्तफा मार्केट, बौद्ध धर्माची मंदिरे,लिटल इंडिया, युनिव्हर्सल  स्टुडिओ नितळ समुद्र किनारे ईत्यादी पर्यटन स्थळ म्हणजे स्वच्छता काय असते याचा वस्तू पाठ देणारीच आहेत.

सिंगापूर मधील सिटीझनचा जीवनाविषयी अफाट उत्साह,स्वतःच्या क्षमतेवरील विश्वास. ,नजरेत भरणारी स्वच्छता व स्वयंशिस्त, नवनवीन प्रयोग करण्याचे साहस,सौंदर्याची पारख,नैतिक जबाबदारी ची जाण,प्रचंड देशाभिमान व प्रेम त्यांच्या नसानसात जाणवल्या.
या दौऱ्यानंतर मला शिक्षणात शिकण्याचा व शिकविण्याचा आत्मविश्वास आला.देशप्रेम व देशाची अस्मिता माझ्या कृतीतूनच दिसायला हवी.आधुनिकतेचा स्विकार व स्वच्छता हेच प्रगती चे गमक आहे असे मी मानतो. माझ्या ज्ञानकक्षा रुंदावल्या असून मी नक्कीच त्याचा उपयोग पुढील सुजाण नागरिक घडविण्याचा प्रयत्न करेन.
आपण वेगळ काय शिकलो,वेगळ काय पाहिले आपल्या आजूबाजूच्या जगात काय दिसत आहे, जाणवत आहे. हे एकमेकांना सांगण एकमेकांच्या अनुभवातून शिकत जाण हाच ह्या सिंगापूर दौऱ्याचा उद्देश आहे.

No comments:

Post a Comment